Miracle morning

१८८०  दिवसापासून सतत ऊर्जा देणारे अग्निहोत्र

दिवसाची सुरुवात बदला ..दिवस बदला ऊर्जा बदला .. आयुष्य बदला ..!

चला दिवसाची योग्य सुरुवात करूया ..!

मिरॅकल मॉर्निंगमध्ये सहभागी होणे म्हणजे दिवसाची दमदार आणि सकारात्मक सुरुवात करण्याची संधी आहे. लवकर उठणारे लोक दिवसातील शांत आणि निवांत क्षणांचा उपयोग आत्मचिंतन, नियोजन आणि उद्दिष्ट निश्चितीसाठी करतात, ज्यामुळे यशाचा मजबूत पाया तयार होतो. सकाळच्या व्यत्यय विरहित वेळेत व्यायाम, वाचन आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या सवयी जोपासून ते शरीर आणि मन दोन्ही सक्षम बनवतात. याशिवाय, सकाळी लवकर उठणाऱ्या समविचारी लोकांच्या सहवासामुळे एक पॉझिटिव्ह कम्युनिटी, प्रेरणा आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. शेवटी, उगवत्या सूर्याचे स्वागत करण्याची ही सवय व्यक्तीला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडविण्यास मदत करते आणि प्रत्येक सूर्योदयासोबत आपल्या अमर्याद क्षमतेची दारे उघडते. “प्रत्येक सकाळ ही नव्या संधीची सुरुवात असते; मिरॅकल मॉर्निंग तुम्हाला त्या संधींचे सोने करण्याची शक्ती देते.”

तुम्ही कशाची अपेक्षा करू शकता ?

योग्य मानसिकता ​
सातत्य
अढळ एकाग्रता
जबाबदारी आणि उत्तरदायित्व ​

मिरॅकल मॉर्निंगचे प्रमुख घटक

शिवराय आरती आणि मंत्र

कृतज्ञता

अफर्मेशन्स

बुक समरी

रोजचे विविध व्यायाम

ध्यान

२ मिनिटांची गोल सेटिंग

टॉप ३ प्रायॉरीटी - दिवसाचे नियोजन

स्वतःचे कौतुक

आत्म- परीक्षण

लर्निंग आणि अचिव्हमेंट चे शेअरिंग

प्रार्थना विश्व

TESTIMONIAL

मिरॅकल मॉर्निंगची जादू

मिरॅकल मॉर्निंग हा ७५ मिनिटांचा एक विशेष उपक्रम आहे, जी मन समाधानी , शांत आणि एकाग्र करण्यास मदत करते. प्रत्येक नव्या दिवसाची आदर्श सुरुवात करण्याचा हा राजमार्ग आहे.
– प्रसाद कदम
TESTIMONIAL

ध्यानाने मिळाली एकाग्रता

मॉर्निंग रिच्युअलमधील अफर्मेशन्स आणि ध्यानामुळे मला माझ्या व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करता आले. यामुळे मनातील अनावश्यक गोंधळ दूर होण्यास मदत होते.

-ऍड केशव कोरगावकर

सातत्याचे दिवस
0 +
योग्य सुरुवात , यशाची हमी

अधिक प्रॉडक्टिव्ह , यशस्वी आणि समाधानकारक जीवनाच्या प्रवासाची सुरुवात आजच करा! 

About Us

शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.

Contact