ABOUT US
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.
आमच्या २५ वर्षाच्या अनुभवावरून एक गोष्ट लक्षात आली,आपल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे आपल्या ध्येयांची व्हायब्रेशन आणि आपली व्हायब्रेशन ह्यातली तफावत हे आहे.शाश्वत स्वराज्यातला प्रत्येक उपक्रम उद्योजकांचे व्हायब्रेशन्स उंचावून त्यांना आयुष्यात येणारी आव्हाने व मोठ्या संधी शोधून त्यांचे सोनं करण्यासाठी तयार करतो.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा व्हायब्रेशन उंचावली कि समस्या अक्षरशः लुप्त होतात व कधीही कल्पना केले नाही असे यश उद्योजक अनुभवू लागतात .आत्मविश्वस वाढतो,सातत्य वाढते बिझनेस वाढतो,नफा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचे समाधान आणि योगदान वाढते.
हे साध्य करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत म्हणजे आपल्या आत पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेल्या शिवप्रेरणेला प्रज्वलित करून तिचे वणव्यात रूपांतर करणं,आपणच निर्माण केलेल्या काल्पनिक अडथळ्यांना ह्या वणव्यात भस्मसात करणं.
ह्यासाठी आपण शाश्वत स्वराज्य हि एक जबरदस्त इकोसिस्टिम निर्माण केली आहे जिचा भाग बनून तुम्ही तुमचे शाश्वत स्वराज्य उभारू शकता.
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ
आमचे उद्दिष्ठ
१९ फेब्रवारी २०३० ( शिवरायांची ४०० वी जयंती ) पर्यंत ४०० हुन अधिक उद्योजकांना ₹५ कोटी+ चा टप्पा पार करण्यासाठी मार्गदर्शन करणे .
आमचा स्वराज्य धर्म-
(मूलभूत तत्वे ज्यांच्याशी आम्ही कधीही तडजोड करत नाही.)
स्वातंत्र्य -
तुम्हाला जे हवंय,जे मनापासून करावंसं वाटतंय तेच करण्याचे स्वातंत्र्य.
सातत्य-
महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्या सतत करून,स्वतःमध्ये व व्यवसायात आमूलाग्र बदल घडवणं.
सेवा-
संभाव्य ग्राहकाची स्वप्न,समस्या व ध्येय ह्यांना सर्वोच्च प्राधान्य देणे.
Our Team
About Us
शाश्वत स्वराज्य ही समविचारी उद्योजकांची चळवळ आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा द्रष्टेपणा आणि आधुनिक व्यवसाय तत्वज्ञान एकत्र येतात.
Contact
- +91 9619313034
- +91 8605722538
- shashwatswarajya@gmail.com